About Mandal
फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
आमच्या श्रीगणरायाचे वैशिष्ट्य असे कि, गणपती बसविण्याकरिता उंच असा मंडप तयार केला जातो. हा मंडप १२ फूट उंचीवर असतो. त्यामुळे मंडपाखालून आयतवेळी रुग्णवाहिका देखील जाऊ शकते.
हायकोर्टाचे सर्व नियम पाळून श्रीगणेशाचा मंडप तयार केला जातो. फोर्टमध्ये नेहमी गर्दी असणारच हे ओळखून ट्रॅफिकला अडथळा न करता मंडपाची उभारणी होते. खालून गाड्या जातात आणि वर मंडपात श्रीगणरायाची मूर्ती स्थापित केली जाते. म्हणून असा आगळावेगळा मंडप पाहणायसाठी लोक आवर्जून येतात.
वातानुकूलित मंडप
फोर्ट च्या इच्छापूर्तीचा संपूर्ण मंडप वातानुकूलित आहे. ५० ते ६० टन ऐसी बसविला जातो. दर्शन घेण्यासाठी भक्तांना जादा वेळ दिला जातो.
कोणालाही ढकलले जात नाही किंवा धक्काबुक्की होत नाही. भक्त येतात, मन भरेल एवढी पूजा करतात. एसीमध्ये थोडा विसावा घेतात आणि मग लोकल पकडून घरी निघून जातात. यामुळे फोर्ट चा इच्छापूर्ती गणराय भक्तांना अतिशय प्रिय आहे. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. बरेच भक्त म्हणतात कि, इच्छापूर्ती श्रीगणरायाचे दर्शन घेतल्याशिवाय सार्वजनिक उत्सव पूर्ण होत नाही.
विशेष म्हणजे या गणरायासाठी ज्या जाहिराती गोळा केल्या जातात, त्यातील एकही जाहिरात राजकीय पक्षाची नसते. कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर याठिकाणी लावला जात नाही. त्यामुळे या गणरायावर कोणत्याही राजकीय पक्षाची छाप नाही. असंख्य वर्तमानपत्र जे छापतात आणि त्याचे वितरण कुशलतेने करतात, त्या बाजीराव दांगट यांचे हे मंडळ आहे. मंडळाचे ते अध्यक्ष आहेत.
यावर्षी अत्यंत सुंदर आर्ट डिझाईन
राजस्थानहून २५ जणांची टीम मुंबईत पोहोचली आणि गेले अनेक दिवस हि टीम मंडप उभारण्याचे काम करीत आहे . या टीमची दोन खास वैशिट्ये असे कि, पुण्यातील दगडूशेट हलवाईचे काम पूर्ण केल्यानंतर थेट मुंबईत येतात आणि इच्छापूर्ती श्रीगणरायाचा मंडप तयार करतात. दरवर्षी या टीमकडून फक्त दोनच मंडप तयार केले जातात. २८ ऑगस्ट २०१८ ला हि टीम मुंबईत आली. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या टीममध्ये जे कारागीर आहेत, ते ‘स्पेशालिस्ट ‘ आहेत. दोन्ही हातानी एकाच नक्षीकाम करणारे हे कारागीर पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. उजवा हात आणि डावा हात एकाच वेळी चालवून अतिसुंदर रेखीव व देखिव नक्षीकाम करणारे हे कारागीर राजस्थानहून येतात आणि त्यांची खास अशी ओळख आहे.
यंदा राजस्थानच्या अतिविशाल राजवाड्याचा देखावा उभारण्यात येणार आहे. याआधी नवसाला पावणाऱ्या २१ गणपतींचे देखावे तयार करण्यात आले होते.
त्यांनतर मारुती (रामदास स्वामी ) यांचे देखावे उभारले गेले. शिर्डीतील साईबाबा मंदिराची प्रतिकृती उभारली गेली. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची देवी], बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, म्हैसूर चा राजवाडा इत्यादी अतिसुंदर देखाव्यांचे मंडप याआधी तयार झाले आहेत. दरखेपेला मंडप उभारण्यासाठी आर्ट डायरेक्टर आनंद सावंत यांची मदत घ्यावी लागते. ते फार मनापासून मदत करतात आणि अतिशय उत्तम डिझाईन तयार करतात. त्यांनी उभारलेला मंडप आजवर सर्वाना आवडलेला आहे. मंडप उभारण्यासाठी अंदाजित ४० ते ५० लाख रुपये खर्च येतो. यंदा रिलायन्स जिओ आणि व्हिडीओकॉन कंपनीकडून आलेल्या जाहिरातींमधून देणगी मिळाली आहे. त्यामुळे अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेला राजवाडा उभा राहणार आहे.
दरवर्षी मूर्ती नऊ फुटांची असते.
मूर्तिकार अशोक म्हात्रे यांच्याकडून दरवर्षी नऊ फूट उंचीची श्री गणरायाची मूर्ती घडवली जाते आणि हि मूर्ती स्थापित केली जाते. या मूर्तीची प्रतिमा भक्तांच्या हृदयात कोरली गेली आहे. त्यामुळे या मूर्तीची जडणघडण आणि उंची बदलली जात नाही. दरवर्षी एकाच पद्धतीची, स्वरूपाची उंचीची आणि त्याच पोझमध्ये मूर्ती बसवली जाते.