Gold Jewellery

श्री गणेशावर सोन्याचे अलंकार

श्रीगणेशावर सोन्याचे अलंकार घातले जातात. सोन्याच्या मुकुट,तोडे, कंगन, सोन्याचे सुळे, सोंडेवरील अलंकार एवढेच नव्हे तर श्रीगणेशाचे शास्त्रदेखील सोन्याचे आहेत. श्री गणेशाच्या चरणासाठी शुद्ध सोने वापरण्यात आले आहे. या श्रीगणेशाच्या अलंकारासाठी सुप्रसिद्ध नाना घोलप याना खास आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांनीच श्रीगणरायाचे सर्व दाग दागिने घडविले आहेत.

या मंडळाने दरवर्षी येणाऱ्या देणगीतून थोडे थोडे पैसे जमा होतात आणि श्रीगणरायाचे अलंकार बनविले जातात. त्यामुळे इच्छापूर्ती श्रीगणरायाची मूर्ती अतिशय सुंदर आणि मोहक दिसते. जेव्हापासून श्रीगणरायाला विविध प्रकारचे दागिने घालण्यात येऊ लागले, तेव्हापासून कमीत कमी १० पोलिसांचा पहारा या मंडपाभोवती असतो. ८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात. ८ सिक्युरिटी गार्डस सतत डोळ्यात तेल घालून पहारा करत असतात शिवाय २४ तास गणेशभक्त आणि कार्यकर्ते मंडपात सुरक्षेसाठी उभे असतात. त्यामुळे आजवर मंडपात एकही दुर्घटना घडली नाही.